जिम्नॅशियम हाल, देशपांडे वाडी येथे महिला दिन संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा किसान वार्ड, देशपांडे वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिमनॅशिअम हॉल देशपांडे वाडी राजुरा येथे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगरध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगरसेविका वज्रमाला बतकमवर, माजी नगरसेविका तथा महिला काँग्रेस शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, विठाबाई वासाई, दगूबाई पाटील, प्रभावती गायकवाड आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी माजी नगरसेविका वज्रमाला बतकमवर यांनी स्त्री शक्ती, स्त्रियांचे अधिकार, आजच्या परिस्थितीत स्त्रियाने स्वतःला कसे घडवले पाहिजे याचे महत्व सांगितले. तर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्याताई चांदेकर यांनी सांगितले की महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत त्यांना कुटुंबियांनी, समाजाने साथ द्यायला हवी, त्या देखील उत्तम कामगिरी करून प्रगती साधित आहेत. आत्मसन्मानाची काळजी घेत स्त्रियांनी प्रगती साधायला हवी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता मोहुर्ले यांनी केले. सूत्र संचालन पल्लवीताई भेदोळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योतीताई शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला माधुरी भौगळे, ललिता पारखी, पाकमोडेताई, ज्योती ठावरी, अनिता बोबाटे, ज्योती पिंपळकर, सविता वाढई, सुनीता कुंभारे यासह आयोजक वार्डातील अनेक महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here