हंसराज अहीरांनी महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयोजित जन्मोत्सव कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

नवी दिल्ली °÷पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर* यांनी उत्तर प्रदेश निवडणूक प्रचार दौरा करून परत येतांना नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयोजित जन्मोत्सव कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. तरुण आणि देशवासियांचे प्रेरणास्थान, कुशल प्रशासक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना नमन केले.
छत्रपती शिवरायांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत पोहोचले होते, हा उत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याप्रसंगी राष्ट्रीय महामंत्री भाजपा श्री विनोद तावडे, खा. सदाशिव लोखंडे, अध्यक्ष राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोग श्री दादा इदाते, छत्रपती संभाजी राजे यांचे कुटुंबीय, आ. रवी राणा यांची उपस्थिती होती.
शिवजन्मोत्सवाच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here