Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा,, विविध स्पर्धा चे आयोजन।   ...

महात्मा गांधी विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा,, विविध स्पर्धा चे आयोजन।                                   

लोकदर्शन 👉 मोहन भारती।

गडचांदूर,,,
महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे थोर गणिततज्ञ डॉ.श्रीनिवासन रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्य प्रा.सौ. स्मिताताई अनिलराव चिताडे होत्या, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे पर्यवेक्षक श्री हनुमानमस्की सौ शोभाताई मत्ते होत्या या कार्यक्रमानिमित्ताने शाळेत गणितीय रांगोळी, प्रश्न मंजूषा, गणितीय डिजीटल पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या, अनेक विध्यार्थ्यांनी उस्फुर्त पणे या स्पर्धात भाग घेतला. प्रास्ताविकातून . विश्वनाथ धोटे यांनी रामानुजन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन सौ,विणा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन तुकाराम धुर्वे यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक, इतर शिक्षकवृंद, विध्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here