उद्या चंद्रपूरात ‘कथालेखन कार्यशाळा’

लोकदर्शन👉 अविनाश पॉईंकर

⭕विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेचे आयोजन

⭕कवी-लेखक-रसिकांना रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर :

विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखा चंद्रपूरच्या साहित्य समितीच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नवकथालेखकांसाठी कथा लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळा उद्या (दि.१२) दुपारी १२ वाजता केसरी विद्यालय, वरोरा नाका चंद्रपूर येथे पार पडणार आहे.

या कार्यशाळेत कथालेखक मो.बा.देशपांडे व कथालेखिका निता कोंतमवार उपस्थित कार्यशाळेतील नवलेखकांना संबोधित करणार आहे. कथालेखनाची तंत्रे व निर्मीतीप्रक्रिया याबाबत ते मार्गदर्शन करतील. कार्यशाळेला परिसरातील कवी, लेखकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन साहित्य समितीचे प्रमुख गोपाल शिरपूरकर यांनी केले आहे.

••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here