निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना सांडपाणी व्यवस्थापनाचा निधी देण्यात यावा.

By : Mohan Bharti

ओबीसी नेते नंदकिशोर वाढई यांची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

राजुरा  :– ग्रामपंचायत कळमना ता. राजुरा जि. चंद्रपूर ला सन २००८ मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला असून सांडपाणी व कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्यामुळे ग्रामपंचायत कळमना ग्रा प ची निवड सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेमध्ये करण्यात यावी तसेच चंद्रपूर जिल्हा मधील ज्या ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे त्यांना सुध्दा सदर योजनेचा निधी देण्यात यावा अशी मागणी कळमनाचे सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या योजनेतून चंद्रपूर जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध झाल्यास स्थानिक ग्रामपंचायतींमध्ये अधिक नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here