माजी न,प,सभापती हरिभाऊ मोरे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

By : Mohan Bharti

गडचांदूर : गडचांदूर नगर परिषदेचे माजी सभापती सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हरिभाऊ मोरे यांनी भाजप ला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला,लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, याप्रसंगी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम जाधव ,युवा नेते आशिष नामवाड, कोवन काटकर यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश केला, सर्वांचे पक्षाचा दुपट्टा घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर,आमदार प्रतिभा धानोरकर,प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रय, राजुरा चे नगराध्यक्ष अरुनभाऊ धोटे,गडचांदूर च्या नगराध्यक्ष सविता टेकाम,तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे,जेष्ठ नेते बाळासाहेब मोहितकर,गटनेते विक्रम येरणे,पापय्या पोन्नमवार,शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष महाडोळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here