पंढरपूर येथे भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ ÷हंसराज अहिर     

लोकदर्शन  – शिवाजी सेलोकर

 श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि ०९ ऑक्टो. रोजी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आयोजित ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ प्रसंगी ओबीसी बांधवांच्या प्रगती व न्यायासाठी कार्य करणारा भाजपा हाच देशातील एकमेव राजकीय पक्ष असून त्यांनी आपल्या कर्तृत्व आणि कार्यातून ओबीसींच्या हिताचे निर्णय घेऊन ते अंमलात आणण्याचे धोरण देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी जी यांनी स्वीकारले आहे असे भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी संबोधन करतांना सांगितले.
भाजपा नेतृत्वातील मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्या सरकारने सुद्धा ओबीसींच्या हिताचे निर्णय घेऊन या घटकांना न्याय दिला आहे. गेली अनेक वर्षात जे कार्य भाजपा विरोधी पक्ष व सरकारांना करता आले नाही ते कार्य भाजपाने केले असल्याने या कार्याचा जागर करीत ओबीसी बांधवानी भाजपा सोबत भक्कमपणे उभे राहून आपल्या उत्कर्षाचा मार्ग प्रशस्त करावा असे आवाहन अहीर यांनी जागर अभियानास उपस्थित ओबीसी बांधवांना केले.
ओबीसी जागर अभियानाअंतर्गत भाजपा ओबीसी मोर्चाच्या नाशिक येथे पार पडलेल्या ओबीसींच्या भरगच्च विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या मार्गदर्शनात भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी आणि भाजपाने ओबीसी बांधव व विद्यार्थ्यांकरिता केलेले भरीव कार्य व आरक्षणातून सन्मान दिला, आर्थिक विकास केला अशा भाजपा सरकारच्या पाठीशी ओबीसी बांधवांनी ठामपणे उभे रहावे असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here