जगदंब ग्रुप आणि समस्त द्रोणागिरी शिवप्रेमी तर्फे शिवजयंती साजरी

 

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २० फेब्रुवारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपेक्स लँडमार्क सेक्टर ५४ / ५५ द्रोणागिरी येथे जगदंब ग्रुप (कोल्हापूर )आणि समस्त द्रोणागिरी शिवप्रेमी तर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ७ वाजता शिवज्योत आगमन व मिरवणूक, सकाळी ९ वाजता मूर्ती प्रतिष्ठापना व आरती, सायंकाळी ४ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम,सायंकाळी ५ वाजता पालखी मिरवणूक,रात्री ९ वाजता महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदंब ग्रुप समितीचे अध्यक्ष विजय सावंत, उपाध्यक्ष निशांत महाजन,खजिनदार प्रशांत सावंत, सहखजिनदार राहुल आकुर्लेकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर माने, उपाध्यक्ष प्रशांत सावंत व इतर सर्व पदाधिकारी सदस्य तसेच रोहन भोसले, बंडूशेठ निरटे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर,उद्योजक नरसु पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील,शिवसेना द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, संघटक द्रोणागिरी किसनशेठ म्हात्रे, व्यापारी संघटना द्रोणागिरी अध्यक्ष रविंद्र पाटील,द्रोणागिरी सचिव -धनंजय शिंदे,से. ४७ व से. ५१ विभाग प्रमुख रुपेश पाटील,से ५० शाखाप्रमुख अंकुश चव्हाण, से ५२ शाखाप्रमुख बापू गरुड,सेक्टर ५३ शाखाप्रमुख अजय भोसले, सेक्टर ५१ शाखाप्रमुख संजय कापसे,से ३० शाखाप्रमुख सन्नी पार्टे, सेक्टर ३० शाखाप्रमुख स्वराज तोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *