गडचांदूरात श्री मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा साजरा

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे

गडचांदूर——कोरपना  तालुका पद्मशाली समाज संघटना गडचांदूर तर्फे नुकतेच गडचांदूर शहरात श्री महामुनी मार्कंडेय ऋषी जन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सर्वप्रथम श्री मार्कंडेय ऋषी यांच्या फोटोची पूजा व आरती करण्यात आली यावेळी विदर्भ पद्मशाली समाज संघटनेचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार,प्रा अतुल अल्लेवार,माणिकगड सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक सुनील अल्लेवार,जनार्धन देवसानी,कोरपना तालुका पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष सतीश बेतावार,सचिव संजय कोंडबतूनवार,प्रवीण बोंमावार,राजेश परसावार,नरसिंग येमूलवार,संतोष बोंमावार,संपत सुके,संजय कोकूलवार,श्रीकांत कुचनवार आदी मान्यवर प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी महिला मंडळानी श्री मार्कंडेय ऋषीची आरती केली या निमित्ताने स्नेहमीलन कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमात समाज बांधवानी विविध नृत्य सादर केले यावेळी तालुक्यातील गडचांदूर, थुट्रा, लखमापुर, वनसडी,नांदा येथील मोठ्या संख्येनी समाज बांधव उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *