आदिवासी समाजाने शिक्षण, आरोग्य आणि न्यायासाठी संघर्ष करावा : डॉ. प्रवीण येरमे

by : Shankar Tadas
कोरपना : अन्न, वस्त्र, निवारा जो देतो तो निसर्गच आपला देव होय. माणसामाणसात कोणताही भेदभाव न करता एकोप्याची शिकवण आदिवासी धर्म देतो. आदिवासी समाजाने शिक्षण, आरोग्य आणि न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे. आपली संस्कृती जपली पाहिजे, असे आवाहन डॉ. प्रवीण येरमे यांनी केले. कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथे सल्ला गागरा उदघाटन समारंभप्रसंगी त्यांनी आदिवासी समाजातील समस्या आणि उपाय यावर प्रबोधन केले.
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके नवयुवक मंडळ बोरी नवेगाव यांच्या वतीने सल्ला गागरा उदघाटन सोहळ्यानिमित्त प्रबोधन, मान्यवरांचा सत्कार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 17 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गाव पाटील नवनाथजी सोयाम, उदघाटक गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येरमे, प्रमुख पाहुणे डॉ. सुधाकर मडावी, मुख्याध्यापक विश्वपती गेडाम, गों. ग. पा.चे अध्यक्ष गजानन जुमनाके, निळकंठजी कोरांगे, संभाजी कोवे, कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला मरस्कोल्हे, उपसरपंच डॉ. विनायक डोहे, सीतारामजी कोडापे, गोंडी धर्म प्रसारक किसनजी कोरांगे उपस्थित होते. उपस्थितमान्यवरानी समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी गडचांदूर तसेच बोरी नवेगाव येथील चमुने गोंडी नृत्य सादर केले. सूत्रसंचालन बोरी नवेगाव येथील शिक्षक विठ्ठल आवंढे तसेच मांडवा येथील लक्ष्मण कुळसंगे यांनी केले. आभार पोलीस पाटील प्रफुल सिडाम यांनी मानले. सोहळा आयोजनाकरिता नवयुवक मंडळाचे अध्यक्ष कैलास तोडासे, उपाध्यक्ष विजय मडावी, सचिव महेंद्र आत्राम, संतोष पंधरे, काशिनाथ कुडमेथे, विशाल येरमे, ईश्वर कुडमेथे, प्रल्हाद पंधरे, बालाजी मडावी, अक्षय सोयाम आदिनी विशेष परिश्रम घेतले. सामूहिक भोजनानंतर रात्री मेघराज मेश्राम यांच्या गोंडवाना ऑर्केष्ट्राचे आयोजन करण्यात आले. गावकरी तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *