हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखा नवघर तर्फे साजरी

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २३ जानेवारी अखंड हिंदुस्तानचे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखा नवघर तर्फे साजरी करण्यात आले. सर्वप्रथम साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करून सर्वांनी साहेबांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर नवघर गावातील अंगणवाडी शाळामधील सर्व लहान मुलांना शिवसेना शाखा नवघर तर्फे खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत नवघर मधील ग्रामसेवक अधिकारी जी. के म्हात्रे , उपसरपंच विश्वास तांडेल, नवघर मधील शिवसेनेचे मार्गदर्शक तसेच माजी उपसरपंच रवींद्र कृष्णा भोईर , नितीन शेठ मढवी, युवा उद्योगपती रवींद्र पाटील, शाखाप्रमुख अविनाश एकनाथ म्हात्रे , ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर तांडेल ,एकनाथ म्हात्रे, प्राथमिक शाळा नवघरचे शिक्षक भारत पाटील , शिवसैनिक संतोष घरत, युवा शिवसैनिक सौरभ घरत तसेच अंगणवाडी शाळेतील शिक्षिका व सेविका तसेच शाळेतील लहान मुले उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *