होम आर एक्स माध्यमातून कल्याण शहरात आधुनिक आरोग्यसेवेचा आरंभ. .!

 

लोकदर्शन डोंबिवली, प्रतिनिधी 👉-गुरुनाथ तिरपणकर

डोंबिवली : कल्याण शहरात एका महत्त्वाच्या घटनेने आरोग्य क्षेत्रात नवा मैलाचा दगड गाठला आहे. मंगळवारी मकरसंक्रांतचे औचित्य साधून होम आर एक्स Home Rx ॲप लाँच करण्यात आले. आरोग्य सेवांमध्ये HomeRx नावाच्या या नवीन ॲपद्वारे, हेल्थकेअरमध्ये एक नवीन दालन उघडले आहे. यावेळी युवा नेते सिद्धेश कपिल पाटील, कल्याण शहराचे डीसीपी सचिन गुंजाळ नगरसेवक वरूण सदाशिव पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष पक्षाचे नाना सुर्यवंशी, जनरल फिजीशियन डॉ. विवेक भोसले, डॉ. नरेंद्र जग्यासी, डॉ एस. पी. काकरमठ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांना चांगल्या आरोग्य सेवांची गरज आहे त्यासाठीच HomeRx तुमच्या घरापर्यंत डॉक्टर पोहोचवून गरजूंना सेवा देणार आहे. होमरएक्स द्वारे एका कॉलवर आरोग्य पथक ताबडतोब उपलब्ध होणार आहे. या केअर कॉलद्वारे, डॉक्टर रुग्णाच्या घरी पोहोचेल आणि तुमच्यापासून दूर असणाऱ्या तुमच्या नातेवाईकांना काळजीमुक्त करेल. विशेष म्हणजे यात डॉक्टर आपल्या घरी येतीलच शिवाय हॉस्पिटला यझेशन, लॅब टेस्ट, CT Scan, MRI सपोर्ट आणि सवलती अशा विविध प्रकारच्या अतिरिक्त सेवांचा देखील समावेश आहे.
झपाट्याने वाढत असताना, समाजाला दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवांची गरज आहे. होमआरएक्सने ही गरज पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला असून हे नवीन पाऊल आरोग्य सेवा सेवेत क्रांती घडवू शकेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी कंपनीचे संस्थापक सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. धीरज खडकबाण, अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योगपती चारुदत्त खडकबाण यांची विशेष उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन होम आर एक्स कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होम आर एक्सचे क्रिएटिव्ह पार्टनर ब्रँडबॉन्ड निलेश यांनी केले. यावेळी डॉ. धीरज खडकबाण म्हणाले, आमची विश्वासार्ह सेवाच आम्हाला विश्वासार्ह बनवते. आरोग्यसेवेचा स्त्रोत, सुसंगत प्रदान करणे आणि अखंडित वैद्यकीय सेवा ही मूल्य आम्ही जपणार आहोत. करुणा हा आपल्या मूल्यांचा गाभा आहे, प्रत्येक बाबतीत सहानुभूती आणि दयाळूपणाला प्राधान्य राहील. वार्षिक दहा लाख रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. उच्च- गुणवत्तेमध्ये पायनियर होण्यासाठी भारतभर वैद्यकीय सेवा देऊन आरोग्यामध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करणे ही आमची दूरदृष्टी आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *