गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन

लोकदर्शन गडचांदूर–👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
-गडचांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन येथे शहरातील जेष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्या बाबत मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गडचांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन केले त्यानी मोबाईल वापर करीत असताना आणि ऑनलाईन पेमेन्ट करतांना जपून वापर करावा व अनेक अनोळखी लोक फोन करून तुमची फसवणूक करू शकतात त्यावेळी सर्वांनी जागृत असणे महत्त्वाचे आहे व आपल्या मोबाइलचा गैरवापर होऊ शकतो व इतरही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे या उपस्थित होत्या जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी हरिश्चंद्र अरोरा,विठ्ठलराव थिपे,प्रा विजय आकनुरवार,डॉ किसन भोयर, जगदीश ठावरी व शहरातील जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ईतर मान्यवर उपस्थित होते यावेळी पोलिस शिपाई भगवान मुंढे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here