शरदराव पवार महाविद्यालयात माजी विद्यार्थी कार्यकारिणी सभा संपन्न*

 

लोकदर्शन 👉 मोहन.भारती

गडचांदुर-शरदराव पवार महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांची कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली.या सभेत 16 आणि 17 जानेवारी 2024 मध्ये महाविद्यालयात येणाऱ्या नॅक मूल्यांकन समिती बरोबर माजी विद्यार्थ्याची संवाद सभा आयोजित करण्यात येणार असून यावर कार्यकारणी मध्ये विशेष चर्चा करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सदर महाविद्यालय प्रगती पथावर असून अनेक चांगल्या सुविधा महाविद्यालयाने केल्या असल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची प्रशंसा केली. मागील वर्षी माजी समितीच्या वतीने लोकशाही आणि आव्हाने या विषयावर विद्यार्थी सेमिनार घेण्यात आला होता.यावेळी भविष्यातील विविध उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यासोबत अभ्यासक्रम आणि रोजगार व भविष्यकालीन उच्च शिक्षणाबाबत चर्चा केली.तसेच येत्या 10 जानेवारी 2024 ला माजी विद्यार्थी सभा आयोजित करण्यात येत असल्याचे ठरविण्यात आले. यावेळ
माजी विद्यार्थी समितीतील प्रा. आशिष दरेकर ,सुधीर परसुटकर. सतीश बेतावार,प्रणाली ताजने,नूतन मेंढी,शशिकांत ढोकणे,अंकित चने प्रफुल मानकर तसेच समन्वयक डॉ.संजय गोरे इत्यादी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *