Home
Home Breaking News आरोग्य सेवेतील सामाजिक कार्यासाठी डॉ कुलभूषण मोरे सन्मानित*

आरोग्य सेवेतील सामाजिक कार्यासाठी डॉ कुलभूषण मोरे सन्मानित*

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदुर 👉(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब आणि भीमसेना बहुउद्देशीय संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचांदूर येथे ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धा आमदार चषक 2023 आयोजित केलेला आहे. विविध राज्यातील राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल च्या चमू यात सहभागी झालेल्या आहेत, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अर्थ फाउंडेशन चे संचालक डॉक्टर कुलभूषण हरिभाऊ मोरे यांचा आरोग्य सेवेतील उत्कृष्ट समाजकार्यासाठी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगर परिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे ,पंडित काळे ,विजय डाहुले ,वासेकर सर ,मयुर एकरे , संतोष गोरे ,विनोद तराळे ,विकी मून, प्रवीण चापले, ओमप्रकाश भोयर, अनिल पिंपळकर ,राहुल ठोंबरे उपस्थित होते. डॉक्टर कुलभूषण मोरे हे अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून जिवती व कोरपणा तालुक्यातील आदिवासी अतीदूर्गम भागात मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून आरोग्य सेवा जनजागृती करत आहेत ,तसेच महिलांच्या मासिक पाळी मधील आरोग्य जनजागृती कापडी सॅनिटरी नॅपकिन वितरण, मोतीबिंदू शिबिर, कुपोषित बालकांचे आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबीर राबवून ग्रामीण जनतेला निस्वार्थ सेवा देण्याचे कार्य तसेच विविध विषयावर समाज प्रबोधन कार्य करत आहेत या कार्याकरिता त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here