सिंधी येथे शेतशिवारात विज पडून ७ जन जखमी. ♦️जखमींवर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे उपचार सुरू ; आबाजी पा. ढुमणे यांनी जाणली जखमींची ख्यालीखुशाली

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– आज दिनांक २४ मार्च २०२३ रोजी राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेतशिवारात विज पडून ७ जन जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी १ वाजेदरम्यान सिंधी येथील मधुकर धानोरकर यांचे शेतात शेतमालक स्वतः, त्यांची पत्नी व इतर १५ मजुर काम करित असताना मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली व अचानक पणे विज कोसळून मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी हे जखमी झाले याशिवाय किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भाष्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृनाल शेषराव बोबडे, अर्चना सुनिल चौधरी असे इतर जखमी झाले असून उपचारार्थ ग्रामीण रुग्नालय राजुरा दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.
यापैकी मधुकर उद्‌धव धानोरकर व उषा सुरेश चौधरी हे जास्त जखमी आहेत अशा माहीती आहे. सदर माहिती मिळताच जेष्ठ काँग्रेस नेते, माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, भाष्कर मोरे, भैय्या मोरे, सुरेश ढुमणे, इर्शाद शेख, तलाठी शेंडे यांनी प्रत्यक्ष रुग्नाची मदत करीत उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून दिलास दिला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *