राहुल गांधींच्या समर्थनार्थ राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन. ♦️राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथे कार्यकर्ते रस्त्यावर.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– केंद्रातील मोदी सरकार सत्तेच्या दबावाने सरकारच्या कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खासदार राहुलजी गांधी हे हुकुमशहा सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणत असल्याने राहुलजींविरोधात अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करून षडयंत्र रचले जात आहे. अशाच प्रकरणामध्ये राहुलजी गांधी यांना अडकून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती येथे प्रत्येक तालुकाच्या ठिकाणी तेसेच गडचांदुर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केंदातील भाजप सरकार च्या अन्यायकारक नितींचा निषेध करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सुबुद्धीने होणाऱ्या कारवाई थांबवण्यात याव्यात असे निवेदन देशाचे राष्ट्रपतींना प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, तुकाराम झाडे, गणपत आडे, महिला तालुकाध्यक्ष कविता उपरे, रेखा रामटेके, नंदाताई मुसणे, ललिता गेडाम, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर वाढई, विठ्ठलराव थीपे, सुरेश चौधरी, साईनाथ बतकमवार, निलेश संगमवार, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, नगराध्यक्षा सविता टेकाम, नगराध्यक्षा नंदाताई बाबणे, सुग्रीव गोतावळे, सपना साकलवार, देविदास सातपुते, प्रा. शंभु येलेकर, वनिता वाघाडे, गौतम झाडे, बालाजी चनकापुरे, सचिन चिंतावार, श्यामभाऊ रणदिवे, सुरेश मालेकर, विमासी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, संतोष गटलेवार, देवेंद्र बट्टे, डॉ. अंकुश गोतावळे, अश्फाक शेख, आशिष डसाने, सुनील शेलकी, संभा कोवे, सिताराम कोडापे, पाप्पया पोनमवार, विक्रम येरणे, राहुल उमरे, प्रा. आशिष देरकर, सचिन भोयर, अशोक राव, शैलेश लोखंडे, संतोष महाडोळे, संतोष बंडावार, भारत रोहणे, निस्सार शेख, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, ज्योतीताई शेंडे, सय्यद साबीर, पंढरी चन्ने, लहु चहारे, मनोहर रणदिवे, कुरूमदास पावडे, मैनाबाई नन्नवरे, श्रीधर रावला यासह राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *