



,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन पुणे👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
: पुणे जिल्ह्यातील श्री. माउली कृपा ज्ञानदान अन्नदान संस्था संचालित बालकाश्रम येथे दाखल असलेल्या बालकांच्या पालकांचा पोलीसांच्या मदतीने शोध घेणे सुरू असून त्यांच्या नातेवाईकांबाबत काही माहिती मिळाली नाही तर त्यांचे महिला व बालकल्याण समिती मार्फत कायमचे पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे नातेवाईकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बालक छुनालाल वय 6 वर्षे,5 महिने, हा मुलगा सध्या, माऊली कृपा ज्ञानदान अन्न दान संस्था,आळंदी. बालकाश्रमात आश्रयास आहेत.या मुलाच्या पुनर्वसन साठी संस्थेच्या वतीने या मुलांचे पालक व नातेवाईक शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.
संस्थेशी संपर्क साधावा.
संबंधित मुलांच्या पालक व नातेवाईकांना 30 दिवसात संस्थेशी संपर्क साधावा. (मो.क्र. ९५५२५०९१५०)अन्यथा या बालकांचे बालकल्याण समिती मार्फत मुलांचे कायमचे पुनर्वसन करण्यात येईल.असे आवाहन करण्यात येत आहेत.