रामबाग महिला समितीच्या वतीने महिला दिन उत्साहात. ♦️कर्तुत्वान महिलांचा सत्कार, विविध स्पर्धांचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– रामबाग महिला समिती राजुराच्या वतीने समाज मंदिर रामनगर कॉलनी राजुरा च्या भव्य रंगमंचावर जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा सत्कार तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रताताई ठेमसकर, प्रमुख अतिथी माजी जि प सदस्य मेघाताई नलगे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, रामबाग महिला समिती संयोजिका पुनम गिरसावडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई मामुलकर, प्यार फाउंडेशन च्या अध्यक्षा कृतिकाताई सोनटक्के, गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, रजनीताई डोंबळे, अनिता बोरकुटे आदी कर्तुत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्वलाताई बरडे, मीनाताई चांडक, नंदाताई बोबडे, राधाताई ढुमणे, सपनाताई गोरे, प्रियंकाताई बुक्कावार, मीनाताई गोप, सोनालताई धनवलकर, उज्वलाताई कातकर, कमलाबाई दावनपल्लीवार, मीनाताई राखुंडे यासह रामबाग महिला समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अंजलीताई गुंडावार यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वातीताई दळवी यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *