Home
Home Breaking News येल्लापुर चे *बालाजी कांबळे* काँग्रेसमध्ये : आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.

येल्लापुर चे *बालाजी कांबळे* काँग्रेसमध्ये : आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.

 

लोकदर्शन 👉 मोहन.भारती

जिवती :– जिवती तालुक्यातील मौजा येल्लापूर गावचे तंटामुक्त समिती चे अध्यक्ष तथा सामजिक कार्यकर्ते बालाजी मनमंत कांबळे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्व व कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुभाष धोटे यांनी त्यांना शाल, श्रीफळ व काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून काँग्रेस पक्षात प्रवेश दिला, त्यांचे स्वागत व सत्कार केला.
या प्रसंगी माजी प स सभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, ताजुद्दीन शेख, माजी सरपंच माधव पेंदोर, संतोष चिकटे, दीपक साबणे, संतोष हर्गीले, बालाजी दुदगोडे, प्रशांत कांबळे, संभाजी ढगे, रावसाहेब बनसोडे, सूरज चिकटे,भास्कर सोनकांबळे यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here