शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचा सत्कार* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *♦️शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देणार- आमदार सुधाकराव अडबाले*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर् –
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुर द्वारा संचालित शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर, सावित्रीबाई फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर आणि सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल व संजय गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पेलोरा आणि स्वर्गीय हरिभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सुधाकरराव अडबाले यांचा सपत्नीक सत्कार महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आला.

सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अधक्ष डॉ.आनंदराव अडबाले होते. प्रमुख अतिथी म्हणून तुळशीराम पुंजेकर,नामदेवराव बोबडे ,माधवराव मंदे,प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, मुख्याध्यापक धर्मराज काळे, कु.गुडघे, केशवराव ठाकरे, विठ्ठलराव थिपे,नामदेवराव ठेगणे, संजय ठावरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते
यावेळी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांनी संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन आमदार सुधाकर अडबाले यांचा सपत्नीक सत्कार केला तर महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन आमदार महोदयांचां सत्कार केला यावेळी संस्थांतर्गत संचालित विविध शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार केला

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विधानपरिषद आमदार म्हणून मी कटिबद्ध असून सातत्याने प्रयत्न करणार असे आश्वासन दिले शिक्षण संस्था व शिक्षकांच्या प्रश्नांची आपल्याला माहिती असल्याने वेळोवेळी शासन दरबारी प्रश्न सोडविण्यासाठी लढा देईल असे प्रतिपादन त्यांनी सत्कारला उत्तर देताना केले
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय कुमार सिंह यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाळे यांनी आमदार सुधाकर अडबाले आपल्या अनुभवातून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय गोरे व प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी संयुक्तपणे केले तर आभार प्रा.डॉ. हेमचंद्र दुधगवळी यांनी मानले सदर कार्यक्रमात सिनेट सदस्य प्राचार्य संजय कुमार सिंह, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. हेमचंद् दूध गवळी व रा से यो राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे नेतृत्व करणारे डॉ.शरद बेलोरकर, समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य डॉ.माया मसराम आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शशांक नामेवार यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवात प्राविण्य प्राप्त तसेच राष्ट्रीय सेवा योजनेत राज्यस्तरीय शिबिरात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी तालुक्यातील अनेक शिक्षक प्रामुख्याने या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *