इन्फंट कॉन्व्हेंट येथे ‘ फॅमिली फन डे ‘ कार्यक्रमाचे आयोजन. ♦️चिमुकल्यांनी घेतला आई – वडीलांसह खेळांचा आनंद.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे नर्सरी, युकेजी, एलकेजी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ फॅमिली फन डे ‘ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आई – वडीलांसह विविध खेळ, नृत्य यांचा आनंद घेतला. यात स्पाॅट द कलर, हूप बॅलन्सिंग, आप्टिकल रेस, डक रेस, म्युझिकल कोन अशा विविध खेळांचा समावेश होता. अनेक पालकांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *