नारंडा येथील तलाव खोलीकरणाला प्रारंभ 

by : Shankar Tadas

कोरपना : तालुक्यातील ग्रामपंचायत नारंडा अंतर्गत लघु पाटबंधारे तलावाच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला आहे. नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.अनुताई ताजने यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर तलावाच्या खोलीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तर्फे करण्यात येत आहे.
राजुरा-गडचांदुर- कोरपना- गोविंदपूर हा राष्ट्रीय राजमार्ग देशाचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून होत आहे, महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या २०१७ च्या शासन निर्णयानुसार सदर रस्त्याच्या कामाला लागणारा मुरूम हा परिसरातील तलाव,नाला यातून वापरण्यात येत आहे,त्यामुळे राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक गावातील नाले,तलाव खोलीकरण करण्यात येत आहे,त्यामुळे पाण्याची भूजल पातळी वाढणार आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सिंचानाकरिता फायदा होणार असून,गावातील नागरिकांना सुधा पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,जीआर इनफ्रा कंपनीचे डॉ. अँड.पूनम कुमार, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,उपसरपंच बाळा पावडे,माजी सरपंच वसंता ताजने,सुरेश पाटील परसुटकर,अनिल मालेकर,अनिल शेंडे,भिकाजी घुगुल,बाळा गाडगे उपस्थित होते.

#narandakorpana

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *