



लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*गडचांदूर -*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध कोंबडा बाजारावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी धाड मारीत मोठी कारवाई केली आहे.
गडचांदूर पोलीस स्टेशनपासून तब्बल 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसन येथील शेत शिवारात 40 ते 50 कोंबडा बाजार शौकिनांची मैफिल रंगली असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना मिळाली होती, या माहितीच्या आधारे नायक यांनी गडचांदूर पोलीस व पथकासहित छुप्या पध्द्तीने सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर धाड टाकून कारवाई केली .
या कारवाई लाखोंचा मुद्देमाल व आरोपींना अटक करण्याची कारवाई केली आहे, मागील अनेक महिन्यापासून गडचांदूर विभागात अवैध धंद्यावर जातीने लक्ष घालत उपविभागीय पोलीस अधिकारी नायक कारवाई करीत असल्याने अवैध धंदे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी केली.