दुल्हाशहा बाबा उर्स उत्सवाला सुरूवात भक्ताची गर्दी,,,,,,,,,

, लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपणा येथून जवळच असलेल्या कुसळ येथील पुरातन काळातील हजरत अब्दुल रहमान दुल्हा शाह बाबा रहमतुल्लाह अलैह याच्या मजारावर परशमकुशाई कार्यक्रम पार पडला दि ४ मार्चला जामा मस्जीद कोरपना येथुन शाही संदल सायं ४ वा उर्स कमेटीकडुन गावात गस्त घालीत मजार वर पोहचून चादर चढविल्या जाणार आहे पोलीस प्रशासनाकडून यात्रा परिस्थीती ,व्यवस्था पाहणी पोलीस अधिक्षक रविन्द्र परदेशी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त पोलीस अधिक्षक जनबधुं मॅडम ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, ठानेदार संदीप एकाडे यांनी व्यवस्थेची पाहणी करूण व्यवस्था व ट्राफिक व्यवस्थेची पाहणी केली जागेसंबधात आढावा घेऊन व्यवस्थेसंबधी सुचना दिल्या यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विदर्भासह तेलंगाना राज्यातुन भाविक व चाहते मोठया प्रमाणात दर्शनासाठी येतात अनेक मन्नत व लंगरचे आयोजन करण्यात आले आहे दि५ मार्च रोजी कौमी एकता कार्यक्रम व कव्वालीचा शानदार कार्यक्रम पार पडणार आहे अनेक मनोरजंनाचे व लहान मुलाना आकर्षित खेळणी व मनोरजंन साधन येथे उपलब्ध झाल्याने व होळी सनामूळे लोकाची बरीच गर्दी होणार आहे, कुंटूबासह अनेक हिन्दु मुस्लीम सर्वधर्मसमभाव एकतेचे दर्शन येथे दिसून येते दोन वर्ष कोरोनानतंर उत्सव साजरा होत असल्याने पोलीसानी चोख बंदोबस्त ठेवला असून ट्रस्टचे अध्यक्ष आबीद अली, सचिव बाबाराव सिडाम ,उर्स कमेटीचे अध्यक्ष शहेबाज अली इसराईल नईम नदिम नादिर कादरी फैजान पवन मडावी यांचे सह सर्वकार्यकर्ते व्यवस्था सह भाविकाची गैरसोयी होऊ नये यासाठी प्रयत्नरत आहेत दरवर्षी ३ दिवस उर्स महोत्सव साजरा केल्या जातो,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *