शेतकरी संघटनेची कोरपना तहसीलवर धडक

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपना च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माजी आमदार ॲड वामनराव चटप यांचे नेतृत्वात कोरपना येथील बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला.
यात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा, पूर व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज शेत पंपाचे विज बिल माफ करण्यात यावे, विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, शेतकऱ्यांना हेक्‍टरी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, वन हक्क कायद्यातील वन जमिनीवरील अतिक्रमण नियमित करून पट्टे देताना तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी व तात्काळ पट्टे द्यावे, शेतमालावर केंद्र सरकारने लादलेला जीएसटी कर रद्द करावा, विजेची दरवाढ मागे घ्यावी, शेतकऱ्यांना बाजारपेठ व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, विरूर व सास्ती येथील शिल्लक राहिलेल्या शेत जमिनी वेकोलीने तात्काळ अधिग्रहीत कराव्या, साप चावून मारणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबास इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, शेतीतील पिकात वन्य प्राण्यांचा होणारा हैदोस लक्षात घेता शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण वाटप करण्यात यावे, जिवती येथे दिवाणी फौजदारी न्यायालय तातडीने मंजूर करण्यात यावे, गडचांदूर आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे , कोरपना येथील क्रीडा संकुलनात सोयी सुविधा पुरवण्यात याव्यां आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी तहसीलदार कोरपना यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड वामनराव चटप, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, तालुकाध्यक्ष बंडू राजूरकर, मदन सातपुते , रमाकांत मालेकर, भास्करराव मुसळे, सुभाष तुरानकर, रत्नाकर चटप , अड श्रीनिवास मुसळे , रवी गोखरे, भास्कर मत्ते,अनंता गोडे , सुरेश राजुरकर,
सुदाम राठोड, शब्बीर जहागीरदार,संजय येरमे, प्रभाकर लोडे, सत्यवान आत्राम, मधुकर चिंचोलकर, भाऊजी कनाके, गणपतराव काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अविनाश मुसळे यांनी केले. या मोर्चाला मोठ्या संख्येने कोरपणा जिवती, राजुरा सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *