जिंकेपर्यंत लढायचं! बीड तालुक्यातील विविध ठिकाणी,शिवगर्जना, सभा संपन्न…

लोकदर्शन बीड ;👉राहुल खरात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शहरात व तालुक्यातील वेगवेगळ्या गाव खेड्यामध्ये शिवगर्जना अभियान पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर व सहकार्यावर सूडबुद्धीने व्यक्तिगत व सामाजिक व राजकीय हल्ले केले जात आहे शिवसेना हा विचार संपवण्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गद्दारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पक्ष सुडबुद्धीने पक्ष , चिन्ह व बाळासाहेब चोरण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा यांचा दुरुपयोग करून चालू आहे केंद्रीय यंत्रणांचा व कायद्याचा दुरुपयोग करून
निवडणूक आयोग व इतर प्रशासकीय संस्था ज्या पध्दती कार्य करीत आहेत त्यावरून भारतीय लोकशाही धोक्यात आलेली आहे अशी जनभावना सर्वसामान्य लोकांमध्ये व शिवप्रेमी मध्ये आहे व देशातील केंद्रीय व राज्यस्तरीय नेतेमंडळी स्वतःच्या सत्ते व खुर्चीसाठी जनमताचा कडेलोट करून हुकुमशाही पध्दतीने काम करत आहेत ह्या सर्व भारतीय लोकशाहीसाठी गंभीर असणाऱ्या बाबींना व प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी भारताचे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानाने दिलेल्या सर्वोच्च जनतेच्या न्यायालयात शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे ही आता जिंके पर्यंत लढायचं हे ब्रीदवाक्य घेऊन तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त शिवगर्जना अभियान राबविण्यात येत असून लोकशाही जिवंत ठेवण्या साठी आमचा पक्ष व चिन्ह हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत न्यायालयीन लढाई सोबतच जनतेच्या न्यायालयात शिवगर्जना अभियान राबवुन लोकांच्याच न्यायालयात जिंकेपर्यंत लढायचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचेच हा ध्यास घेऊन बीड जिल्ह्यातील शिवसेना कामास लागली आहे याच अनुषंगाने बीड शहरातील गांधीनगर भागात व औरंगपूर जवळा व तालुक्यातील विविध ठिकाणी शिव गर्जना अभियान राबवण्यात आले यावेळी शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख माननीय धोंडू दादा पाटील साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय अनिल दादा जगताप साहेब शिवसेना नेते शेख निजाम दिलीप अण्णा गोरे बाबासाहेब घुगे परमेश्वर सातपुते रतन तात्या गुजर पप्पू बरीदे नितीन धांडे सुदर्शन धांडे सुनील भाऊ अनुभुले गोरख सिंगन सुनील सुरवसे शेख अमर जैनुद्दीन हाफिज शेख अशपाक कयूम भाई इनामदार खादीरभाई बोरफडीकर जयंत वाघ शेख अशपाक आदी शिवसैनिक उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *