वडगाव येथे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर चे रासेयो चे विशेष शिबिर संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय,गडचांदूर चे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वडगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित केले होते. कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे जेष्ठ संचालक श्री विठ्ठलराव थिपे होते सात दिवस चाललेल्या कार्यक्रमाची दैनंदिनी ठरली होती. सकाळी पहाटे उठून गावाची साफसफाई केली, गावकऱ्यांसाठी रक्त तपासणी हिमोग्लोबिन तपासणी, कॅन्सर तपासणी ,पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली तर दुपारी बौद्धिक कार्यक्रम घेऊन गावकऱ्यांचे प्रबोधन केले . या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच, सचिव, उपसरपंच ,इतर सदस्य, तंटा मुक्त समिती व इतर जेष्ठ नागरिकांनी हिरिरीरीने सहभाग घेतला व कार्यक्रमाला मदत देखील केली. कार्यक्रमाला , विशेष अतिथी डॉ.स्वप्नील टेंभे,( तालुका आरोग्य अधिकारी, )सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार ,टाटा ट्रस्ट चंद्रपूर डॉ. विशाल मालकर , तहसील कार्यालय कोरपना हे वक्ता म्हणून लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य रामकृष्ण वाय. पटले यांनी विशेष मदत केली होती.या कार्यक्रमातून एन एस एस च्या स्वयंसेवकाचे तसेच गावकर्यांचे मनोरंजन व प्रबोधन झाले . कार्यक्रमासाठी पवन चतारे, चेतन वानखेडे, मनोहर बांद्रे, डॉ अनिस खान, डॉ. अजयकुमार शर्मा, , व डॉ. उत्कर्ष मून व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन डॉ. संदीप घोडिले ,एन. एन. एस समन्वयक यांनी केले ,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *