जसखार गावातील तरूणाईने ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला दिला एक नवीन आदर्श

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २४ डिसेंबर 2022संपुर्ण उरण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत खऱ्या अर्थाने उत्सुकता होती ती प्रतिष्ठा पणाला लावलेले सर्व जसखार गावातील राजकीय पक्ष त्यांच्या विरुध्द युवा सामाजिक संस्था सर्व गावातील तरुणांनी गावच्या सर्वागीण विकासासाठी तयार केलेली संघटना.

मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो म्हणून तर द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा उमेदवार कडून समाजहिताची कार्य होत नाहीत.पैसेवाला जर ग्रामपंचायत मध्ये निवडला गेला तर गाव हिताच्या कामात अडथळा येईल आणि साधारणपणे हेच मत प्रत्येक नागरिकांचे असत की निवडणूक म्हटल की पैसे लागणारच!कशासाठी तर तो मतदार मतदान करणार आहे त्यासाठी.

ह्यावेळी युवा सामाजिक संस्था हि निवडणूक पैशाच्या जोरावर नव्हे तर ग्रामस्थांना आशीर्वादमुळे जिंकली.हव्या असणाऱ्या गोष्टी जर मिळाल्या तर त्याची मने जिंकता येतील अगदी हेच काम युवा सामाजिक संस्था जसखार मागील दोन वर्षात केले आणि या ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरी गेली.

सर्व धनदांडगे राजकीय शक्ती असणारे जसखार गावा चे सर्व पक्षीय पुढारी विरुध्द गाव विकासाची कास धरलेले युवावर्ग अशी लढत गावात झाली.आजपर्यंत गावच्या कोणत्याही प्रश्नांसाठी एकत्र न आलेले राजकीय पुढारी एकत्र आले ते पण कोणा विरुद्ध गावातील युवा तरुणा यांच्या विरुद्ध म्हणून संपूर्ण उरण तालुक्यात या ग्रामपंचायत निकालाची प्रतिक्षा होती
निवडणूक निकाल राजकीय पक्ष व धनदांडगे पुढारी यांच्या बाजूने लागणार ही सर्व गावात चर्चा होती परंतु खऱ्या अर्थाने जसखार गावात लोकशाहीचा विजय झाला तब्बल सदस्य पदाचे ११ उमेदवार पैकी ७ जागा या युवा सामाजिक संस्था जसखार यांच्या निवडून आल्या आणि त्या सुध्दा एकही रुपया निवडणुकीत खर्च न करता आणि सरपंच पदासाठी पण अतिशय रोमहर्षक लढा युवा संस्थेने दिला फक्त ८० मताने पराभव पत्करावा लागला युवा संस्थेचा सरपंच पदाचा उमेदवार पराभव झाला परंतु संपूर्ण गावात सत्ता ही युवा संस्थेची आली हि गावा गावात चर्चा आहे .
ग्रापंचायत चा कारभार थोड्या कालावधीत हे नवनिर्वाचित सदस्य घेणार आहेत आणि स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याचे अभिवचन ग्रामस्थांना युवा संस्थे ने दिलेले आहे म्हणून राजकीय पुढारी व धनदांडगे नेते ह्यांनी निवडणूक काळात संपवले ले पैसे कसे परत कमवायचे सर्व मार्ग युवा संस्था बंद करणार आहेत म्हणून सर्व जसखार गावचे पुढारी यांचे धाबे दणाणले आहेत.आज गावात सर्वात जास्त मते मिळणारी युवा संस्था यशस्वी ठरली आहे.

लवकरच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत या सर्व जसखार गावातील राजकिय पुढाऱ्यांना शह देण्यासाठी युवा संस्था सज्ज झाली आहे शेजारील गावातील नवतरुण शी चर्चा करून आपल्या सभोवताली होणारे औद्योगिकरन व रोजगार संधी यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी सर्व गावात एकजूट झाली पाहिजे न्याय मिळिण्याकरिता लढा उभारला पाहिजे या साठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि तरुणाचा प्रतिसाद सुद्धा तेवढाच चांगला आहे म्हणून या पंचायत समिती जिल्हा परिषद निवणुकीत जसखार गाव व शेजारील गावचे नवतरुण एक राजकीय पक्ष विरहित एक नवीन पर्याय समस्त ग्रामस्थांना देणार आहेत आणि या निवडणुकीत सुध्दा बदल घडेल अशी आशा आहे. आजपर्यंत सर्व राजकारणी लोकांनी स्वतःच्या हिता साठी राजकारण चा उपयोग केला आहे आता जनतेच्या हिता साठी हा बदल घडायला हवा असे सर्वीकडे बोलले जात आहे

युवा संस्थेने मागील दोन वर्षापूर्वी सुरू केलेली सर्व कामे मार्गी लावून जसखार गावाला न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन युवा सामाजिक संस्था ने स्पष्ट केले आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवा सामाजिक संस्था जसखारने निवडणुकीत उतरून उमेदवार निवडून आणले. त्यामुळे अशा सामाजिक संस्थाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे एक आदर्श उदाहरण युवा सामाजिक संस्थांने सर्वांसमोर ठेवले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *