महिलांनी आरोग्य विषयक योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. सुहास कोरे

By : Ajay Gayakwad

वाशिम

* माविम आरोग्य मेळावा उत्साहात : ६०० रुग्णाची तपासणी

मालेगाव : शासनाच्या वतीने आयोजित आरोग्य मेळाव्याचा लाभ प्रत्येक महिलांनी घेवून आरोग्य विषयक योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे यांनी  केले .महिला आर्थिक विकास महामंडळ वाशीम च्या वतीने अमानी येथील गोडंबी व्यवसाय करणाऱ्या बचत गटाच्या महिला करीता आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते . बॅक ऑफ महाराष्ट्र यांनी महिलांना आरोग्य किट उपलब्ध करून दिली याबदल त्यांनी सामाजीक जबाबदारी पार पाडल्या बाबत कौतुक करून माविम सदैव महिलांच्या सर्वांगिण विकासाची जबाबदारी पार पाडते असे सांगीतले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीएच ओ डॉ. सुहास कोरे उपस्थित होते . प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास राजेश सोनखासकर , डेप्युटी झोनल मॅनेजर बॅक ऑफ महाराष्ट्र गोविंदराव इंगळे , कौशल्य विभाग फेलो प्रतिक बाराहाते , अजय घुगे . माविम वाशीम चे एडीसीओ समीर देशमुख . सरपंच अनिल जाधव गजानन गवळी सुमीत धुमाळे . डॉ. संतोष बोरसे . अनिल लहाने . डॉ. देशमुख डॉ. सुशील भांगडीया . डॉ.खडसे. सीएमआरसी मॅनेजर प्रा.शरद कांबळे . लेखापाल पुष्पा नलगे आदी मान्यवर . उपस्थित होते या वेळी राजेश सोनखासकर गोविंदराव इंगळे समीर देशमुख डॉ. भांगडीया डॉ.खडसे डॉ.देशमुख प्रतीक बाराहाते यांनी महिलांना मार्गदर्शन केले आरोग्य विभागाच्या वतीने महिला रुग्णाची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले . तर बँक ऑफ महाराष्टू च्यावतीने आरोग्य किटचे वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये 550 च्यावर महिलांनी लाभ घेतला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माविम सीएमआरसी मालेगाव २ चे व्यवस्थापक प्रा.शरद कांबळे ‘ लेखापाल पुष्पा नलगे सहयोगीनी चंद्रभागा माने सीआरपी वनिता अंभोरे रुपाली तायडे गाव विकास समिती बचतगट महिलांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे संचालन प्रा.शरद कांबळे यांनी तर आभार आरोग्य सेवक किरण जिरवणकर यांनी मानले.

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *