म्हसवड मध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी ! ⭕ पुणे पंढरपूर रोड काही काळ बंद

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

म्हसवड ; – जातीवादी भाजपा व आरएसस यांनी फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुरोगामी विचारांची सतत बदनामी करुन जाती जाती मध्ये तेढ निर्माण करुन दंगली घडवण्याचा आज पर्यंत नऊ वेळा कधी छत्रपती शिवाजी महाराज, कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर, कधी महात्मा फुले तर कधी संभाजी महाराज यांचे बद्दल लोकांच्या भावना दुखावल्या जातील असे बेताल वक्तव्य करुन या महामानवाने बदनाम करण्याचा ठेका घेणारे दलाल पुन्हा सत्तेवर येणार नाहीत यांची खबरदारी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा मानणार्या माझ्या बांधू आणि भगिनींनी तरुण वर्गाणी घेतली तरच ह्या जातीवादी सत्तेचा पाडाव होणार आहे प्रत्येक वेळी निषेध करुन चालणार नाही सत्तेची मस्ती उतरण्यासाठी बहुजनांनी जागे होणे गरजेचे आहे अशा शब्दांत महामानवाचा अवमान करणार्या चंद्रकांत पाटील यांच्या निषेध रॅलीला संबोधन करताना किशोर सोनवणे यांनी म्हटले
शुक्रवारी पैठण या ठिकाणी पिण्याचे पालक मंत्री व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणकरांना खुश करण्यासाठी महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू करताना पदर पसरुन,भिकमागून शाळा सुरू केल्या असे अपमानास्पद बोलून महात्मा फुले कर्मवीर आण्णा, व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ म्हसवड येथे आज रविवारी बौद्ध धर्मियांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा निषेध व सातारा पंढरपूर रोडवर डॉ बाबासाहेब चौक या ठिकाणी दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी कुमार सरतापे, अंगुली बनसोडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, दिलीप तुपे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, युक्रांदचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार डोंबे , रिपब्लिक सेनेचे अजित केवटे, नगरसेवक शहाजी लोखंडे, महेश सराटे, फारुख काझी, माजी नगरसेवक शिवदास रसाळ, बाबासाहेब बनसोडे, शिवराम बनसोडे, अजित साठे, संतोष लोखंडे दलित पँथरचे प्रमोद लोखंडे वंचितचे शहराध्यक्ष शहाजी लोखंडे राष्ट्रवादीचे सचिन लोखंडे, राजेंद्र माने बाबू सरतापे सचिन सरतापे, रणजित सरतापे, विशाल सरतापे, सौ शलाखा सरतापे,सौ स्वाती जोडगे, सौ सुकेशीनी सरतापे आदी महिला व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
यावेळी कुमार सरतापे म्हणाले प्रत्येक वेळी महापुरुषांचा अवमान झाल्यावर केवळ बौध्दांनीच आंदोलन करायची का फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फक्त भिम आनुययांचेच आहेत का , इतरांना जयंती, उत्सवापुर्ते फुले शाहू आंबेडकर शिवाजीराजे दिसतात का उघड्या डोळ्यांनी त्यांची बदनामी होत असताना हे समाज्याचे नेते पुढारी शांत का आपल्या महामानवाचा अवमन होत आहे तरी या चंपाचा निषेध केला जात नाही हि शोकांतिका आहे असे कुमार सरतापे म्हणाले दिलीप तुपे म्हणाले आजचा निषेध मोर्चा हा कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या विरोधात नव्हता, तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती व विचारधारेचा निषेध करण्यासाठी काढण्यात आला, चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या ‘बेताल’ वक्तव्याचा निषेध करत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची द्यावा व यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व यापुढे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात कायदा
करावा अशी मागणी करण्यात यावा या आशयाचे निवेदन म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांना देण्यात आले
यावेळी म्हसवड पोलीसांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता या रस्ता रोको दरम्यान सातारा पंढरपूर रोडवरील वाहतूक दोन तास रोखण्यात आल्याने सातारा व पंढरपूर दोन्ही बाजूला शेकडो वाहणे थांबली होती

.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *