ज्ञानसिंधु साहित्यगौरव राज्यस्तरीय पुरस्कार समाजसेवक साहित्यिक संदीप राक्षे प्रदान

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन पुणे 👉.प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक यांच्या वतीने राणी भवन नाशिक येथे 2 मार्च ला लेखक व सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे यांना राज्यस्तरीय ज्ञानसिंधू साहित्यगौरव पुरस्कार, जयप्रकाश जातेगावकर सर, डाॅ शंकरजी बो-हाडे सर, डाॅ वेदश्री थिगळे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.. संदीप राक्षे हे माहिती व तंत्रज्ञान संगणक इंटरनेट आणि मोबाईलच्या डिजिटल युगात सामाजिक सांस्कृतिक कला व साहित्य क्षेत्रातील गरजूंना आधार मिळेल असेच काम करीत असतात, गड किल्ले पुरातन मंदिर या ठिकाणांची भटकंती करून ते प्रवास वर्णन आपल्या लेखणीतून साक्षात उभे करतात, लेख वाचताना वाचकांना प्रत्यक्ष सोबत असल्याचा भास होतो. असे दर्जेदार लेखन करून अपरिचित स्थळांचा परिचय करून देतात. हे कार्य संदीप राक्षे यांचे खूप मोठे आहे. नवोदित साहित्यिकांना मदत करून त्यांच्या लेखणीला प्रोत्साहन देतात, भटक्या वंचित मुलांच्यासाठी संदीप राक्षे अहोरात्र कार्य करीत असतात. समाजसेवेच व्रत घेतलेले संदीप राक्षे कुठल्याही क्षेत्रात अग्रेसर पणे काम करीत असतात. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रभरात कार्यरत असतात हे विशेष आहे. अशी उत्तुंग कामगिरी करणा-या संदीप राक्षे यांच्या कार्याचा आलेख सतत उंचावत राहो या साठी हा पुरस्कार…त्यांना प्रदान करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *