कोरपना येथे संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

प्रमोद गिरडकर

कोरपना :
संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कोरपना शहरात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पालखी राम मंदिर ते गिरडकर लेआउट पर्यंत काढण्यात आली. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेला ज्या समाज बांधवांनी देणगी दिली त्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मुरलीधर गिरडकर, सेवानिवृत्त न्यायमूर्ती नागपूर, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नोगराजजी मंगरूळकर माजी सभापती पंचायत समिती कोरपना, प्रमुख अतिथी सौ. नंदाताई विजयराव बावणे नगराध्यक्षा नगरपंचायत कोरपना, प्रमुख अतिथी श्री विजयरावजी बावणे संचालक जिल्हा चंद्रपूर मध्यवर्ती बँक, श्री गजाननरावजी खामनकर माजी सरपंच ग्रामपंचायत माथा, श्री गणपतरावजी गिरडकर ज्येष्ठ नागरिक तथा माजी पोस्टमास्टर कोरपना, डॉक्टर योगेश प्रकाशराव घटे, डॉ. दादाजी रघुनाथ नित सेवानिवृत्त शिक्षक(वणी ), धनराजजी गिरडकर अध्यक्ष श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलीक विकास संस्था कोरपना, श्री उद्धव कुमार तडस सचिव श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलीक विकास संस्था कोरपणा, श्री विक्रमजी येरणे नगरसेवक गडचांदूर, श्री भारतजी चन्ने, डॉक्टर शंकर गिरडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर गिरडकर सेवानिवृत्त न्यायमुर्ती आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र न्यायिक प्राधिकरन बेंच नागपूर यांनी तेली समाज बांधवाचे समाज मंदिर बांधकामाकरिता पाच लाख रुपये देण्याचे घोषित केले. 21 डिसेंबर 2022 ला श्री संत संताजी जगनाडे महाराज बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येईल व बांधकाम एका वर्षात करण्यात येईल असे श्री विजयरावजी बावणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांनी सांगितले. यावेळी कोरपना तालुक्यातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन विजय लोहबळे संस्थेचे सदस्य यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव उद्धवकुमार तडस यांनी केले तर आभारप्रदर्शन संस्थेचे सदस्य नितीन विजयराव बावणे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *