



लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांकरिता टॅलेंट शो चे आयोजन करण्यात आले. यामाध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण विकसित व्हावेत, त्यांच्यात आत्मविश्वास आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणाला चालना मिळावी या हेतूने टॅलेंट शो चे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या गीत, संगीत, नृत्य वेशभूषा अशा विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले.
या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका संगीता नाकाडे यांनी कार्यक्रमाचा पदभार सांभाळला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन ज्योत्स्ना टेकाम यांनी केले.