उरणमध्ये वाहनांना आग लागण्याचे प्रमाण वाढले


लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 19 .नोव्हेंबर 2022उरण तालुक्यातील जे एन पी. टी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर धुतुम गावाजळ शुक्रवार दि 18/11/2022 रोजी संध्याकाळी 6:45 च्या सुमारास चालू डम्परला अचानक आग लागली. गाडीत असलेल्या ड्रायवरने आग लागताच डम्पर मधून उडी मारून आपला जीव वाचविला. या अचानक लागलेल्या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतेही जीवीतहानी झाली नाही. या घटनेमुळे या मार्गावर असलेली वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

MH 46 AR 6372 या नंबरचा डम्पर धूतूम कडून उरण कडे जात असताना डम्परला अचानक आग लागली.संध्याकाळी 6.45 ला आग लागल्याचे लक्षात येताच वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक संजय पवार यांनी अग्नीशामक दलाला फोन केले. त्वरित अग्नीशामक दलाने भडकलेली आग आटोक्यात आणली 7.15 पर्यंत संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिस प्रशासन व अग्निशामक दलाला यश आले.ही आग लागलेल्या डम्पर जवळच पेट्रोल पंप होते तसेच जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज जेएनपीटी बंदरात ज्वलनशील पदार्थ तसेच भारत पेट्रोलीयम व विविध रासायनिक पदार्थाची वाहतूक करणारी वाहनांची ये जा सुरु असते. या परिसरात रासायनिक,ज्वलन शील पदार्थांवर प्रक्रिया करणारे अनेक कंपन्या आहेत.अशा अत्यंत महत्वाच्या मार्गावर अचानक वाहनांना आग लागणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अंत्यत धोकादायक आहे.नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.सदर आग विझविण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उप निरीक्षक संजय पवार,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलीस नाईक -प्रवीण गावित, शहाजी फटांगरे, विशाल भिसे तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *