



लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 15 नोव्हेंबर 2022
उरण कला अध्यापक संघटना व जायंट्स ग्रुप वेल्फेअर फाउंडेशन उरण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्री. भिकाजी गोविंद तांबोटकर यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त न भूतो न भविष्य असा उरण शहरातील विमला तलाव बागेमध्ये भरलेल्या चित्रकला स्पर्धेत उरण तालुक्याच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जायंट ग्रुप तर्फे अध्यक्ष विनायक पै ,माजी अध्यक्ष रोशनलाल मेहता, माजी अध्यक्ष देवेंद्र पिंपळे तसेच सचिव योगेश म्हात्रे यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले. कलाअध्यापक संघटनेतर्फे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव भूषण जाधव ,जोशी सर, संतोष सर, राजश्री मॅडम, फातिमा मॅडम अशा अनेक कला शिक्षकांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जगदीश नैकर, पद्मजा नैकर, चैत्राली चेतन ठक्कर यांनी परीक्षण करून विद्यार्थ्यांना पारितोषिके जाहीर केली. पारितोषिके काढताना कश्या पद्धतीने पाहिलं गेलंय याचे स्पष्टीकरण केले गेले. असा हा आगळावेगळा प्रथमच उरण परिसरात उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड भूषण संगीता ढेरे यांचीही उपस्थिती लाभली .तसेच पी.एस.आय माने हेही उपस्थित होते.158 विद्यार्थ्यांनी या चित्रकले स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. सर्व स्पर्धकांना खाऊ वाटप व ज्यूस देण्यात आले.हा उपक्रम राबवण्यासाठी पंचायत समिती, नगरपालिका आणि पोलीस स्टेशन यांच्या परवानगीमुळे उत्तम प्रकारे साकार होऊ शकला .न भूतो न भविष्य असा या उपक्रमाला उरण मधील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद लाभला.श्रीमती प्रियवंदा तांबोटकर मॅङमने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले .