अमेघा घरतला कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 13 नोव्हेंबर २०२२दिनांक 12/ 11/ 2022 रोजी सोनुभाऊ बसवंत कॉलेज शहापूर येथे मुंबई युनिव्हर्सिटी तर्फे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत अमेघा घरत हिने 57 किलो वजनी गटात गोल्ड मेडल प्राप्त केले.या कामगिरीमुळे तीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.उरण तालुक्यातील खोपटे गावची कन्या अमेघा अरुण घरत हिने या अगोदरही कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत अनेक पारितोषिके मिळविली आहेत.शहापूर येथील कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्याने अमेघा घरत हिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here