



लोकदर्शन 👉सौ भारतीय वसंत वाघमारे
मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे
देवी दुर्गाचे दुसरे रूप ,
देवी ब्रह्मचरणीला समर्पण .
लाल साडी नेसून माळ दुसरी
देवी ब्रह्मचरणीला केलीअर्पण.
कठोर तपचर्या करून,
ब्रह्मचरणी नाव पडले .
दुर्गा देवीच्या दुसऱ्या रूपाला,
नतमस्तक होऊन हात जोडले.
एका हातात कमांडलू ,
एका हातात माळ.
भजनात होऊन दंग ,
भक्त वाजवती टाळ .
करुन तपा चरण
शंकरास घेतले प्रसन्न करून .
दूध मिठाईचा देऊन नैवेद्य
षोडशोपचारे केले पूजन.
शिवशंकर पतिप्राप्तीसाठी,
देव ऋषींनी दिले वरदान .
अन्नाचा करून त्याग ,
निर्जळी केले तपाचरण .
सौ भारतीय वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे