

लोकदर्शन 👉 मोहन भारती
।
गडचांदूर
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय ,गडचांदूर येथे 26 जानेवारी 2022 ला 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ऍड. विठ्ठलराव धोटे यांचे शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले तसेच मुख्याध्यापिका सौ स्मिता चिताडे यांच्या हस्ते आरएसपी व स्काऊट गाईडचे झेंडावंदन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव .धनंजय गोरे संस्थेचे संचालक. रामचंद्र सोनपितरे , श्रीमती उज्वलाताई धोटे ,सौ प्रतिभाताई धोटे उपप्राचार्य विजय आकनुरवार ,उपमुख्याध्यापक अनिल काकडे ,पर्यवेक्षिका सौ शोभा जीवतोडे,पर्यवेक्षक एच. बी. मस्की,महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर चे प्रभारी प्राचार्य रामकृष्ण पटले,महात्मा गांधी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री धनराज मालेकर ,होते
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील मुलींनी देशभक्तीपर समूह गीत सादर केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रशांत धाबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, प्रदीप परसुटकर यांनी केले.कार्यक्रमात,विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते,