सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे.-महेंद्रशेठ घरत

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि २६ सर्वोदय विचारांची, तत्वज्ञानाची ओळख व्हावी या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अंतर्गत सर्वोदय संकल्प तीन दिवसीय शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील नेरे येथील शांतीवन मध्ये घेण्यात आले होते. शुक्रवार दिनांक २३सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधी मध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि आधुनिक समाजा समोरील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी गांधी विचारसरणीचा अवलंब करणे म्हणजे सर्वोदय होय. सर्वोदय हा समाजातील सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार करणारा विचार आहे. व्यक्तीची सहाय्यता महत्त्वाची मानणारा, आर्थिक व सामाजिक समतेवर आधारलेल्या शासनमुक्त समाजाचा आग्रह धरणारा हा विचार आहे. सत्य व अहिंसेवर आधारित स्पर्धा, विषमता, संघर्ष आणि शोषणाला मुळीच स्थान नसलेली व समाजाच्या अगदी कनिष्ठ पातळीवरील व्यक्तीलाही विकासाची समान संधी उपलब्ध करून देणारी समाजरचना म्हणजे सर्वोदय होय. या विचारात समाज कल्याण साधण्यासाठी भौतिक, आर्थिक व आध्यात्मिक साधनांवर भर देण्यात आला आहे. ज्या समाजात सर्व व्यक्ती व गटांना सूख लाभू शकेल असा समाज सर्वोदय-विचार निर्माण करू इच्छितो.असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. या तीन दिवशीय सर्वोदय संकल्प शिबिरामध्ये रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा ऍड.श्रद्धाताई ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष निखिल डवले, रायगड जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष अखलाक शिलोत्री, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नंदराजशेठ मुंगाजी, पेण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक मोकळ,संदीप पाटील,पनवेल पंचायत समितीचे मा.उपसभापती वसंत काठावले, पनवेल शहर जिल्हा ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील, वैभव म्हात्रे,रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष. किरिट पाटील,नयना घरत, बापु मोकल,अविनाश पाटील, सुभाष घरत, मुरलीधर ठाकूर,भरत गायकवाड,जयंता घोपरकर, केसरी नाईक, अरुण म्हात्रे, अरुण पाटील रुकेश काठावले, राजेंद्र भगत, आनंद ठाकूर,अलिबाग NSUI चे अध्यक्ष प्रज्वल पडोले, दिपक ठाकूर,योगेश रसाळ,विवेक म्हात्रे आदि काँग्रेस कार्यकर्ते व अनेक सामाजिक संस्थांनचे कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते.या शिबिराचे आयोजक धवलकिर्ती देसाई( गुजरात ), अरविंदकुमार द्विव्वेदी (सांताक्रुज मुंबई )यांनी केले होते.
या शिबिरास मार्गदर्शक म्हणून. अमर खानापुरे (लातूर ), प्राध्यापक डॉ.प्रमोद ओवलेकर (अमरावती ), भूपेंद्रसिंग (राजस्थान ), नितेश बनसोडे (अहमदनगर )यांनी मार्गदर्शन केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *