कोरपणा तालुक्यातील शे. संघटना व गोंगपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. ग्रा. प. वडगाव व गट ग्रा. प. रामपूर येथील कार्यकर्त्यांचा समावेश.

 

लोकदर्शन👉.मोहन भारती

कोरपना :– कोरपना तालुक्यातील ग्रा. प. वडगाव व गट ग्रा. प. रामपूर येथील शेतकरी संघटना आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार धोटे यांनी काँग्रेस पक्षात स्वागत केले. यात पक्ष शेतकरी संघटनेचे विठ्ठल खारकर, योगेश उरकुडे, शामकांत निकोडे,नामदेव देवगडे, दादाजी किनाके, श्रीकांत निकोडे, शशिकांत निकोडे, शंकर कन्नाके, एकनाथ पाचभाई, अशोक उरकुडे, शंकर निमकर, दिपक ताजने, गजानन परसुटकर आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाचे सुरेश आत्राम, लिंगा चतकारी, सुरेश किनाके, अरजु चिकराम, नागु आडे, रामदास कन्नके, वासुदेव यडमे, सुरेश कोटनाके, जंगा किनाके, सुरेश शेडमाके, चंद्रभान किनाके यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
या प्रसंगी अशोकभाऊ आस्कर, सुदर्शन डवरे, सुरेश मालेकर, दिगंबर लाजेकर, भास्कर तुरणकर, प्रकाश कुचनकर, शंकर मोहितकर, अनिल उरकुडे, गुलाब जीवतोडे, कैलास मेश्राम, नागोबा देवाडकर, शंकर पिंगे, तुकाराम बोकडे, चंद्रशेखर येवले, पांढरी उरकुडे, अजय लांजेकर यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *