*चार दिवसांनंतरही आरोपी मोकाटच* *विलास मांडवकर आत्महत्या प्रकरण* *आरोपीना अटक करा ,अन्यथा आंदोलन* *. *समाज संघटनेचा इशारा**

 

लोकदर्शन 👉 प्रतिनीधी

*गडचांदूर*
गडचांदूर शहरात घडलेल्या विलास मांडवकर आत्महत्या प्रकरणातील आरोपीवर मागील 14 सप्टेंबर च्या रात्रौ गुन्हा दाखल होऊनही आज चार दिवसाचा कालावधी लोटूनही , आरोपीना अटक करण्यात गडचांदूर पोलिसांना अपयश येत असल्यामुळे मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंब दहशतीत वावरात असल्याने ,आरोपीना त्वरित अटक करा नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा खैरे कुणबी संघटना गडचांदूरच्या वतीने निवेदना मार्फत गडचांदूर पोलिसांना देण्यात आला आहे .
मागील 11 सप्टें रोजी गडचांदूर येथील वार्ड .3 मधील विलास वासुदेव मांडवकर यांनी शेतीच्या व्यवहारत झालेल्या फसवणुकीतून आत्महत्या केल्याची घटना समोर आली .त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मध्ये शरद जोगी व प्रशांत पंचभाई यांनी तुझ्या बायको ,मुलांना मारून टाकीन अशा स्वरूपाच्या धमकी मुळे ,दहशतीती आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे .
मयत विलास मांडवकर यांना उपचारासाठी चंद्रपूर ला नेताना त्यांचा मृत्यू झाल्याने मर्ग झालेली कागदपत्र आल्यानंतर गडचांदूर पोलिसांनी दि.14 सप्टेंला रात्रौ आरोपी शरद जोगी व प्रशांत पाचभाई यांचेवर कलम 306 ,34 अन्वये गुन्हा दाखल केला .मात्र आज चार दिवस लोटूनही मात्र आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिक प्रश्न करीत आहेत तर विलास मांडवकर यांचा परिवार मात्र दहशतीत वावरत आहे .
मयत विलास मांडवकर यांनी सुसाईड नोट मध्ये उल्लेख असणाऱ्या आरोपीना त्वरित अटक करून दहशतीत वावरनाऱ्या विलासच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा अन्यथा खैरे कुणबी संघटना गडचांदूरच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे .निवेदनाच्या प्रतिलिपी एकनाथ शिंदे ,मुखमंत्री ,(म.रा .) देवेंद्र फडणीस ,गृहमंत्री / उपमुखमंत्री (म. रा .) सुधीर मुनगंटीवार ( वने व सांस्कृतिक मंत्री म.रा .) सुभाष धोटे .आमदार राजुरा , छेरिंग दोरजे पोलीस महानिरीक्षक नागपूर विभाग , अरविंद साळवे जिल्हा पोलीस अधीक्षक ,चंद्रपूर , सुशीलकुमार नायक (उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांना देण्यात आल्या आहेत .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *