देवघाट येथील हनुमान मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा कधी मिळणार?

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील देवघाट रीठ येथील पुरातन हनुमान मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा व परिसराचा विकास साधण्यात यावा अशी मागणी परिसरातील भाविक – भक्त गणाकडून होते आहे. देवघाट हे पुरातन काळापासून वैभव संपन्न गाव होते. परंतु गावात अज्ञात रोगाची लागण झाली. त्यामुळे तेथील वस्ती लगतच्या लोणी , कुसळ आदी गावात स्थलांतरित झाली. तेव्हापासून या स्थानी आजवर स्थिर वास्तव्य करणारी वस्ती लाभली नाही.आज रीठ स्वरूपात हे गाव ठिकाण आहे. पूर्वी वस्तीचा भाग असलेल्या या ठिकाणी आज संपूर्ण शेती क्षेत्र आहे. येथून जाणाऱ्या देवघाट नाल्याच्या तीरावर हे हनुमान मंदिर आहे. परंतु या पुरातन मंदिराला आजगायत तीर्थक्षेत्रचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे या संपूर्ण परिसराचा विकास रखडला आहे. या कारणाने या मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा देऊन विकास साधण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या मंदिर स्थानी जायला पक्का मार्ग नाही.तसेच मूलभूत अनेक सुविधांची वानवा आहे. त्यामुळे या मंदिर व परिसराचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.

पुरातन मुर्त्या कडे दुर्लक्ष
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देवघाट हा ऐतिहासिक दृष्ट्या वैभव संपन्न परिसर आहे. येथे अनेक देवी – देवता आदीच्या विखुरल्या स्वरूपात मुर्त्या ऊन वारा पाऊस झेलत जागोजागी पडल्या आहे. त्यामुळे त्यांचे एकत्रित संकलन करून जतन करणे इतिहासाच्या दृष्टीने गरजेचे आहे. पुरातत्व विभागाने या मुर्त्याची नोंद घेऊन या मुर्त्या संरक्षित कराव्या. त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने त्या परिसरात एखादी संग्रहालय उभारून किंवा नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात संकलित करून जतन करण्यात याव्या . जेणेकरून भावी पिढीला हा समृद्ध वारसाचा इतिहास रुपी ठेवा कळण्यास सोयीचे होईल.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *