आदर्श अभियंता पुरस्काराने राजेवाडीच्या पी . एम . वाघमारेंचा सन्मान .*

 

लोकदर्शन आटपाडी 👉 राहुल खरात

दि . १६सप्टेंबर राज्य शासनाच्या “उत्कृष्ट अभियंता ” पुरस्काराने आटपाडी तालुक्यातील राजेवाडीच्या सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पी . एम . वाघमारे व सौ. दिपाली वाघमारे यांचा सपत्नीक मुंबई येथे सन्मान करणेत आला .
मुंबई येथील षण्मुखानंद हॉल मध्ये भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिना निमित्तच्या “अभियंता दिनी” सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री . पी .एम . वाघमारे यांना हा पुरस्कार प्रदान करणेत आला . यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री . मनोज सौनिक, सचिव एस. एस . साळुंखे, सचिव पी. डी . नवघरे, रस्ते विकास महामंडळाचे सचिव अनिल गायकवाड, सचिव के . टी . पाटील इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .
श्री पी.एम.वाघमारे यांनी १९८० मध्ये पंढरपूर येथून सेवाकाळ सुरू केला. पुढे १९८६ ते १९९९ पर्यंत माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे शाखा अभियंता म्हणून उत्तम काम केले . १९९९ या वर्षी ते उपअभियंता पदावर पदोन्नतीने आरुढ झाले . वाई , महाबळेश्वर इंदापूर व पुणे येथील पदोन्नती नंतरच्या कार्यानी पी . एम . वाघमारेंची कारकीर्द चांगलीच बहरली. त्यांनी आपल्या सेवाकाळामध्ये अनेक पुल, शासकीय इमारती, शेकडो किमी चे रस्ते बांधणी, श्री . ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वृक्षारोपण, वारकऱ्यांसाठी विश्रांती स्थाने, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले त्याची नोंद “लिम्का बुक” मध्ये झालेली आहे.
२०१५ साली कार्यकारी अभियंता झालेल्या पी . एम . वाघमारे यांच्या कार्याचा केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, माजी मंत्री श्री . विजयसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री श्री . हर्षवर्धन पाटील, दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या हस्तेही यापूर्वी गौरव झाला आहे . ३९ वर्षे इतक्या प्रदीर्घ काळामध्ये सार्वजनीक बांधकाम खात्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच सामाजिक कामामध्येही अग्रेसर राहिल्याने पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या हस्ते दै . सकाळ ने उत्कृष्ट प्रशासक म्हणून बेस्ट एक्सलन्स अवार्ड ने ही पी . एम . वाघमारे यांना गौरविले होते .
माळशिरस विधानसभा राखीव मतदार संघातून अकलुजचे माजी मंत्री विजयसिंहदादा मोहिते – पाटील यांनी गेल्या निवडणूकीत पी . एम . वाघमारे यांना संधी द्यावी अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती . पी . एम . वाघमारे यांना विधीमंडळात आमदार म्हणून संधी मिळाल्यास ते आपल्या प्रदिर्घ अनुभवी ज्ञानाचा उपयोग विकासाबरोबर समाज परिवर्तनासाठी करतील असा विश्वास त्यांच्या हजारो चाहत्यांना आहे . आदर्श अभियंता म्हणून सन्मानीत झालेल्या पी . एम . वाघमारे यांचे सर्वत्र अभिनंदन, कौतुक होत आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *