कोप्रोली चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडी विषयी भाजपा ट्रान्सपोर्ट सेल तर्फे पूर्व विभागातील गोडावूनना निवेदन.

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे)

दि 14 सप्टेबर वाहतूक कोंडीची समस्या हि उरणच्या पाचवीलाच पुजलेली आहे. उरण तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या, गोडावून असल्याने मालांची ने आण करण्यासाठी अवजड वाहनांची खूप मोठी रांग उरण मधील प्रत्येक रस्त्यावर दिसते. अधून मधून पोलिस प्रशासनाच्या वाहतूक विभागा मार्फत कारवाई होते मात्र अवजड वाहनांची पून्हा बेकायदेशीर पार्किंग सुरू होते.तसेच वाहने वेडीवाकडी रस्त्यातच लावल्याने व रस्ता अरूंद नसल्याने अवजड वाहने वळण घेण्यासाठी मुख्य रस्त्याचाच वापर करत असल्याने उरणमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अशीच प्रकारची वाहतूक कोंडी उरण तालुक्यातील पूर्व विभागातील कोप्रोली चौकात होत आहे. पूर्व विभागात अनेक CFS आहेत. यार्ड आहेत.कंपन्या आहेत. या यार्ड, कंपन्या मधून अवजड वाहनांची नेहमी ये जा सुरू असते. त्यामूळे पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसून येते. काही दिवसापूर्वी कोप्रोली चौकात अवजड वाहनांमूळे वाहतूक कोंडी झाली होती त्यातच एका एम्ब्युलन्सला तासनतास ताटकळत बसावे लागले होते. एम्ब्युलन्स मध्ये रुग्ण होते.त्या रुग्णाला उपचाराची तातडीने गरज असताना देखील मात्र वाहतूक कोंडी मूळे ते रुग्ण काही वेळ ऍम्बुलन्स मध्येच होते. शेवटी कोप्रोली चौकातील नागरिकांनी एकत्र येत हि वाहतूक कोंडी सोडविली.रुग्णालय मध्ये योग्य वेळेत त्या रुग्णाला पोहोचता आले नाही त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे द्रान्सपोर्ट सेलचे उरण तालुकाध्यक्ष सुदेश पाटील यांनी भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हाजी अरफात शेख , प्रभारी अध्यक्ष आशिष शेलार,उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पूर्व विभागातील विविध CFS, गोडावून, कंपन्यांना निवेदन दिले. या निवेदनात संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत जड वाहने बंद ठेवावीत अशी विनंती करण्यात आली आहे. संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत कोप्रोली चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून याचा त्रास संध्याकाळी शाळा कॉलेज, सूटलेल्या विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्ग, व्यापारी व सर्वसामान्यांना होत आहे. सदर समस्या भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे उरण तालुकाध्यक्ष सुदेश पाटील, उरण पूर्व विभाग भाजप अध्यक्ष शशी पाटील ,भाजप कार्यकर्ते सूरज पवार, सागर घरत यांनी CFS, गोडावूनच्या व्यवस्थापक, सुपरवायझर यांना भेटून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत आमदार महेश बालदी,उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,वाहतूक विभागाचे पोलीस उप निरीक्षक संजय पवार यांनाही निवेदन देण्यात आले. वाहतूक कोंडी विषयाबाबत पोलीस प्रशासना सोबतहि सकारात्मक चर्चा झाली.वाहतूक कोंडी याबत गोडावून, CFS च्या व्यवस्थापकांनी, सुपरव्हायजर यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन भाजपा ट्रान्सपोर्ट सेलच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *