



लोकदर्शन 👉सौ भारती वसंत वाघमारे
मंचर
पितृपक्ष येता येते
पूर्वजांची आठवण
राब राब राबून दिले
आज आनंदाचे क्षण
पूर्वजांची करतो आम्ही
पूजा मनोभावे
पितृपक्षात तुम्ही आमच्या
घरी जेवणासाठी यावे
चुकले आमचे काही
समजून घ्यावे
नमस्कार करतो आम्ही
आशिर्वाद द्यावे.
स्मरण आम्ही करतो
पदोपदी तुमचे
आठवणीत तुमच्या
नयनी अश्रू येते आमचे
पितृपक्षात पुर्वजांचा
पहीला मान
नतमस्तक तुमच्या पाई
राखू पुर्वजांचा सन्मान
फेडून ऋण पितरांचे
पितृपक्षात
भरवू घास त्यांना
खीर पुरी वरण भात.
सौ भारती वसंत वाघमारे
मंचर