आजार ग्रस्त महिलेच्या मदतीकरिता धावून आली युवा प्रतिष्ठान  कोरपना ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, एक हात मदतीचा म्हणनू २० हजाराची केली आर्थिक

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर :
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
– जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले या सुभाषितप्राणे समाजातील दिन दुबळ्या , विकलांग व व आजार ग्रस्त घटकांकरीता युवा प्रतिष्ठान आजपर्यंत सदैव कार्य करीत आहे ..

गरीब नागरिकाच्या रुग्णाच्या मदतीकरिता सदैव तत्पर असणाच्या युवा प्रतिष्ठान कोरपणा यांनी आज कोरपना येथील वार्ड क्रमांक १० मधील राजु दर्शनवार यांच्या पत्नी सौ. संध्या दर्शनवार यांना जलपंढु आजाराने ग्रस्त होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक व हालाकीची असल्यामुळे त्यांना योग्य उपचार करता येत नव्हता, व दिवसेंदिवस त्यांचे आरोग्य हालावत चालले होते.ही बाब युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन भाऊ बावणे व सर्व सदस्यांना कळताच युवा प्रतिष्ठान ने नेहमी प्रमाणे मदतीचा हात समोर करीत त्यांच्या उपचारासाठी रोख रक्कम वीस हजार रुपयांची (२०,०००) आर्थिक मदत त्यांना केली, व पुन्हा एकदा कोरपना नगरीतील नागरिकांना दाखवले युवा प्रतिष्ठान सदैव गरजूंच्या मदतीसाठी तत्पर आहे.

यापूर्वीही कोरोना काळामध्ये युवा प्रतिष्ठान तर्फे अनेक गरजु  रुग्णांकरिता अनेक मदती करण्यात आली होती उदाहरणार्थ किराणा कीट  असो की औषधी असो की दवाखान्यात उपचारा करिता पैसे असो

अशा प्रकारे प्रतेकाच्या अडचणी मध्ये मदतीचा हात देण्याचे मोलाचे कार्य युवा प्रतिष्ठान करत आहे व रुग्ण आणि गरजू व्यक्तीसाठी

सदैव तत्पर राहू आणि त्यांना मदतीचा हात देऊ. हे युवा प्रतिष्ठान तर्फे सांगण्यात आले.

 

संध्या ताई दर्शनवार यांना मदत करतांना

युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन भाऊ बावणे, कोरपना नगरपंचायत चे उपाध्यक्ष इस्माईल भाई ,नगरसेवक मोहम्मद भाई, लाल मादेवार, गंगाधर बुरेवार, मोबिन भाऊ, श्रीकांत लोडे,  सुरज खोबरकर, आशिष मेश्राम, नवाजीश भाई, अमोल लोडे, तुषार भोयर, दिलीप जाधव, प्रतीक डोंगे, विशाल भोयर, संकेत राऊत, नईम शेख, समिर आमने, शुभम गोचे, क्रिष्णा बोढे, राहुल जाधव, हर्ष डोंगे, विनीत गंगशेट्टीवार, ओमकार मुके, रोशन बोबडे, रितिक मडावी, मयुर सोनट्के, नावेद पठान, अभिषेक ईटनकर, व सर्व युवा

प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थीत होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *