**सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदू। ===================== *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची१३१ जयंती.   

लोकदर्शन 👉मोहन भारती

  1. =================

गडचांदूर (दि.14 एप्रिल2022)
*सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे दि.14 एप्रिल 2022रोजी * विश्वरत्न, बोधिसत्व , संविधानाचे शिल्पकार, महामानव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतिचा कार्यक्रम घेण्यात आला.*
*याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. धर्मराज काळे सर, प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक श्री. संजय गाडगे, कला विभाग प्रमुख जहीर सर, खैरे सर, गुजर सर, कु.चटप मॅडम, मरी शंभरकर मॅडम. ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकासांडे सर उपस्थित होते.
*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व भीम गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री प्राचार्य धर्मराज काळे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची तसेच सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या संघर्षाची माहिती सोदाहरण सांगितली भारताला एकसूत्रात बांधून ठेवण्याचे काम संविधानाने केले असे मत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कला विभाग प्रमुख जहिर सर यांनी आपल्या मार्गदर्शनात बाबासाहेबांच्या विचारांचा परिचय करून देण्यासाठी पन्नास वर्ष कमी पडेल असे विचार मांडले ,तसेच सध्या देशामध्ये ची परिस्थिती सुरू आहे त्याचे आकलन अभ्यासू व सुशिक्षित बांधवांनी करावे व बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग स्वीकारावा असे विचार व्यक्त केले . प्रमुख ख् मार्गदर्शक म्हणून बोलताना
प्रा. खैरे सर यांनी स्वलिखित कवितेतून चातुर्वर्ण व्यवस्थेने बहुजनांचे जीवन कसे यातनामय केले होते याचे अनेक उदाहरण आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच महाड येथील संघर्ष, काळाराम मंदिर प्रवेश ही क्रांती संपूर्ण भारतात नव्हे तर जगात एक वेगळी क्रांती आहे हे पटवून दिले. प्रा.गुजर सर यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा परिचय करुन दिला. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या कु. चटप मॅडम यांनी शिवरायांचा आदर्श व महात्मा फुले यांचा क्रांतीचा मार्ग बाबासाहेबांनी कसा अंगीकारला व त्यालाच समाजक्रांतीचे चे स्वरूप देऊन महिला उद्धाराचे कार्य केले हा विचार व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पर्यवेक्षक गाडगे सर यांनी येणाऱ्या शैक्षणिक धोरणा संदर्भात शिक्षकांनी जागृत व्हावे कदाचित या माध्यमातून खरा इतिहास बहूजन समाजापर्यंत पोहोचेल की नाही अशी शंका व्यक्त केली. तसेच शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला. कु. शंभरकर मॅडम यांनी भीम गीत गाऊन बाबासाहेबांना नमन केले.
याप्रसंगी एन के बावनकर, राजेश मांढरे ,गजानन बोबडे राजेश वासेकर , सी. जे. घाटे, कु.प्रा.सोज्वल ताकसांडे प्रा.मेहरकुरे , गोपंमवार मॅडम, कु.उमरे मॅडम , ,सातारकर सर,श्रीमती शेंडे मॅडम,प्रीतेश मत्ते, सिताराम पिंपळशेंडे, शशिकांत चन्ने , इत्यादीनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तथा प्रस्ताविक सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. झाडे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *