आंबेडकरांनी दिलेला मंत्र शिका संघटित व्हा संघर्ष करा विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावा.-विनोद आल्हाट

लोकदर्शन 👉 राहुल खरात


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे विद्वत्तापूर्ण व्यक्तीमत्व ठरले असून त्यांनी उभारलेला सामाजिक समतेचा लढा आणि विद्यार्थी युवकांना दिलेला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र आताच्या पिढीने कायम लक्षात ठेवावा असे आवाहन पलूस पंचायत समिती शिक्षण विभागातील गटसाधन केंद्राकडील दिव्यांग विभाग प्रमुख विनोद आल्हाट यांनी पलूस येथे केले. जिल्हा परिषद शाळा नं.२ पलूस येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ उज्वला पाटील होत्या. प्रारंभी विनोद आल्हाट यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले.त्यानंतर आंबेडकरांनी दिलेले संदेशांचे फलक सर्व विद्यार्थ्यांच्या कडून वाचन करून घेण्यात आले.यावेळी विनोद आल्हाट म्हणाले की आंबेडकरांनी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी त्यांना होणारा जातिभेदाचा प्रचंड त्रास जो स्वतः त्यांनी भोगला,अनुभवला व कठिण परिस्थिति ही लहानपणापासून अठरा-अठरा तास अभ्यास करून उच्च शिक्षण घेतले आणि भारतातल्या अस्पृश्यतेविरुद्ध सामाजिक समतेचा आणि न्यायाचा लढा उभारला.ब्रिटिशांच्या काळात विद्वत्तापूर्ण भाषणांनी त्यांनी जगातल्या अनेकांना अचंबित केले.देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर भारताच्या संविधान निर्मिती मध्ये त्यांनी मोलाचे योगदान देऊन या देशातील अस्पृश्यता कायद्याने कायमची नष्ट केली आणि सामाजिक समतेचा लढा यशस्वी केला. तेव्हा त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा विद्यार्थ्यांनी युवकांनी घेणं आणि आपल्या जीवनात चांगल्या पद्धतीने उभं राहणं महत्त्वाच आहे. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेतील शिक्षक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार सौ सुनीता पवार यांनी मानले.या कार्यक्रमास संभाजी पाटील, जगन्नाथ शिंदे, श्रीमती शैलजा लाड,सौ.जाधव,शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य शारदा पवार ,अंगणवाडी सेविका पाटीलताई,तसेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *