दै. वृतरत्न सम्राटच्या वाटचालीसाठी जाहिरातीच्या माध्यमातून योगदान महत्वाचे. कौटुळ गावच्या सदिच्छा भेटीप्रसंगी सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचा नागरी सत्कार.

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

फुले,शाहू,आंबेडकर चळवळीला खऱ्या अर्थाने गती येण्यासाठी स्वाभीमानाने जगा, प्रामाणिक रहा, थोर राष्ट्रीय महापुरुषांचे विचार आत्मसात करुन वाचन संस्कती टिकवा, संघटिक होऊन आपले अस्तित्व सिध्द करा, असे स्पष्ट करुन पश्चिम महाराष्ट्रामध्ये दै. वृतरत्न सम्राट चि वाटचाल पुन्हा जोमाने सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक समाज बांधवानी केवळ देणगी स्वरुपात मदतीचा हात देण्याऐवजी जाहीरातीच्या माध्यमातून आपले योगदान द्यावे असे आव्हान दै. वृतरत्न सम्राट चे संपादक बबन कांबळे यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील कौटुळ (ता.आटपाडी) या गावास सदिच्छा भेट देण्यासाठी ते आलेले असताना त्यांचा कौटुळ ग्रामस्थ, रिपाई (आठवले गट), वंचित बहुजन आघाडी, साहित्यरत्न शंकरराव खरात प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपाई (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात होते. स्वागत प्रास्ताविकात बोलताना कौटुळ गावचे सुपुत्र तथा दै.वृतरत्न सम्राटचे स्तंभ लेखक रेल्वेचे प्रशासकिय अधिकारी डॉ.डी.एस.सावंत यांनी दै.वृतरत्न सम्राटच्या वाटचालीचा आढावा घेतला. संपादक बबन कांबळे यांनी फुले, शाहू, आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याचे काम सम्राटच्या माध्यमातून केल्यामुळे बहुजन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठी आपण तन-मन-धनाने योगदान देण्यासाठी पुढे यावे असे आव्हान देखील त्यांनी केले. यावेळी उपसरपंच नवनाथ कदम, दलित मित्र भगवान जाधव, रमेश रत्नाकर, सुमेध माने, अरुन जावळे, सुभाष मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्य रत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठाणचे सचिव विलासराव खरात यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ.शंकरराव खरात जन्मस्थळास सदिच्छा भेट दिल्याबद्दल दै.सम्राटचे संपाकद बबन कांबळे यांना धन्यवाद दिले. फुले,शाहू,आंबेडकर चळवळीमध्ये समाज बांधवांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सम्राटने पत्रकारितेच्या माध्यमातून सुरु केलेल्या चळवळीला मदत करावी असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. सत्काराला उत्तर देताना सम्राटचे संपादक बबन कांबळे म्हणाले आपल्या जन्मभूमीमध्ये संस्काराची जडणघडण झालेल्या डॉ.डी.ए.सावंत यांनी आपल्या गावाचे नांव उज्वल केले आहे. गावास सदिच्छा भेट दिली असताना त्यांच्या कार्याचा मला अभिमान वाटला. माझ्या नागरी सत्कारातून त्यांच्या कार्याची मला ओळख पटली. सावंत मोठा माणूस आहे. ते गावाचा कायापालट नक्किच करण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे ठरणार असल्याचे सांगून सम्राटला आपण जाहिरातीच्या माध्यमातून पाठबळ द्यावे असे आव्हानही केले.
अध्यक्ष स्थानावरुन बोलताना रिपाई चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी अलिकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सम्राट उपलब्ध होत नसला तरी दै.वृतरत्न सम्राट वाचक व हितचिंतकाच्या माध्यमातून सम्राटची विचारधारा तळागाळातील घटकाच्या माध्यमातून सोशल मिडीयाद्वारे पोहोचविण्याचे काम सुरु आहे. दै.वृतरत्न सम्राटचे सांगली जिल्हा प्रतिनीधी शिवाजीराव कांबळे यांनी सम्राटच्या यशदायी वाटचालीसाठी दिलेले योगदान महत्वाचे असल्याचे स्पष्ट करुन पश्चिम महाराष्ट्राम पुन्हा सम्राटच्या गतीमान वाटचालीसाठी संपादक बबन कांबळे यांनी लक्ष घालावे व लवकरच सम्राटची पश्विम महाराष्ट्र आवृत्ती सुरु करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी उपसरचंप बापू लोहार डॉ.चंदनशिवे,अरुन वाघमारे,बाबूराव मोटे,बाबूराव खरात, साहेबराव चंदनशिवे,आनंदराव ऐवळे,सनी कदम, किरन वाघमारे,रमेश पेंटर, शैलेश एवळे,बाबा ऐवळे,महादेव ऐवळे, सुभाष बनसोडे आदिसह ग्रामपंचायत सदस्य साहित्यरत्न शंकरराव खरात प्रतिष्ठानचे पदाधिकारी फुले,शाहू,आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दै.सम्राट पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीमध्ये काम करीत असलेले वृत्तपत्र प्रतिनीधी व जिल्हा प्रतिनीधी उपस्थित होते.
आभार सुभाष मोटे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *